नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या कार्यकाळात काहीच मिळाले नाही गेल्यावर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अध्याप तरी केवायसीच्या नावाखाली अनुदान अथवा पीक विमा मिळाला नसल्याने सदरच्या पालकमंत्र्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीच नव्हते असे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे
सन २०२४ मध्ये राज्यात महायुतीची एक हाती सत्ता आली असताना सुद्धा मुख्यमंत्री व सरकार बनविण्यासाठी फार विलंब लागत असला तरी जिल्ह्यातील काही आमदार पालकमंत्र्याचे स्वप्न पाहत असताना दिसून येत आहे
तत्कालीन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे जिल्ह्यासाठी शेतकऱ्यासाठी मोठे योगदान आहे
नांदेड जिल्ह्याच्या विकासाठी स्थानिक जिल्ह्याचा पालकमंत्री राहणे अत्यंत आवश्यक असून या जिल्ह्यासाठी पालकमंत्री आयात नको अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
या नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री शेतकऱ्याचे हित जोपासणारा असला पाहिजे अंगठे येत नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान असो पीक विमा असो अथवा पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे पैसे मिळवून देणारा पालकमंत्री असावा असे शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे

0 Comments