नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त पैलवान मंडळीनी मोठया संख्येनी सहभागी होण्यासाठी भाविक भक्तांनी व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने घुंगराळ्याच्या यात्रेत उपस्थित राहण्याचे असे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता कैलास बोंडले यांनी आवाहन केले आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील श्री खंडोबा रायाची यात्रा मोठ्या उत्साहात दर वर्षी भरवली जाते सदरच्या यात्रेनिमित्त समस्त गावकऱ्यांच्या वतीने भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम व मैदानी खेळ म्हणजे कुस्त्या अशा अनेक कार्यक्रमांनी घुंगराळ्याची खंडोबाची यात्रा आकर्षक दर वर्षी आकर्षक केल्या जात आहे
घुंगराळा हे गाव नांदेड ते हैदराबाद राजे महामार्गावर असल्यामुळे या सदर गावाच्या परिसरातील व जिल्ह्यातील व महाराष्ट्र बाहेरील पैलवान या यात्रेसाठी कुस्तीच्या फडात कुस्त्या खेळण्यासाठी येणार असल्यामुळे पैलवान मंडळी सह यात्रेसाठी व्यापारी त्याच बरोबर भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे युवा उद्योजक कैलास बोडंले यांनी आवाहन केले आहे

0 Comments