Header Ads Widget

घुंगराळ्यात आज कुस्त्यांची दंगल तर उद्या संध्याकाळी कला महोत्सवाचा आकर्षक कार्यक्रम वसंत पाटील सुगावे यांची माहिती !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील हे गाव खंडोबा यात्रेच्या माध्यमातून आकर्षण ठरले असल्यामुळे आज उद्या प्रशासनातील मोठे शासकीय कर्मचारी अधिकारी सदरच्या यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत 
घुंगराळा येथे आज कुस्त्यांची दंगल तर उद्या कला महोत्सवाचा रंगदार कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या वतीने जोरदार तयारी झाली असल्यामुळे सदरचे घुंगराळा गाव हे खंडोबारायाच्या भक्तीत तलीन होन विविध कार्यक्रमाचे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम खंडोबा मंदिरावर वाघे अधि कार्यक्रमा बरोबर घुंगराळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये कला महोत्सवाचे आयोजन गावकऱ्यांनी केले असल्याची माहिती देण्यात आली आहे 

तालुक्यातील घुंगराळा येथे श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्याच्या कार्यक्रमा बरोबर कला महोत्सवाच्या पशु शक्ती प्रदर्शन व घोडा प्रदर्शनच्या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे 

घुंगराळा यात्रा कमिटीच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे व ग्रामविकास अधिकारी हनमंतराव बाबाराव शिंदे यांनी केले आहे 

Post a Comment

0 Comments