नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह वनविभागाचे जिल्हा उपवनसरक्षक वाबळे एम एस ईबीचे अधीक्षक अभियंता जाधव व प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक कळसाइत यांना घुंगराळ्याच्या यात्रेसाठी निमंत्रित- वसंत पाटील सुगावे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने आकर्षक सन्मानच झाला पाहिजे या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दरवर्षी प्रशासनातील अधिकाऱ्याला बोलून त्यांचा यात्रेच्या निमित्ताने मोठा सन्मान करीत आहे
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांना सुद्धा सदरच्या यात्रेनिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्या बरोबर एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान गावकऱ्याच्या वतीने झाला पाहिजे या हेतूने वसंत पाटील सुगावे यांनी निमंत्रित करणार आहेत
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेची जयत तयारी होताना दिसून येत असून यंदाची यात्रा ही विविध कार्यक्रमाने रंगणार असल्याने आयोजित करण्यात येत असल्यामुळे वरिष्ठ पातळीतील प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना बोलून घुंगराळा येथील यात्रेचे स्वरूप काय असते हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी मोठा प्रयत्न करीत आहे

0 Comments