Header Ads Widget

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातअवैध रेती दोन हायवा एक जेसीबी सह तिनं जना विरुद्ध गुन्हा दाखल वारे वा पोलीसाची दमदार कामगिरी !!

      माधव पवार 
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस टीमच्या पथकाने बढीया कामगिरी करत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध रेती दोन हायवा एक जेसीबी सह तिनं जना विरुद्ध गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे 
ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कसल्याच प्रकारचा अवैध धंदा चालू देणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिला होता तसे ऑनलाईन बातमी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ६ डिसेंबर २०२४ रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली होती

नवीन नांदेड, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गंगाबेट  शिवारात अवैधरित्या साठवून ठेवलेली ६ ब्रास रेती  अंदाजे ३६ हजार रुपये व दोन हायवा एक जेसीबी  असा एकुण  मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी ४ वाजून ४५ मिनिटानी ते ६ वाजण्याच्या दरम्यान, मौजे गंगाबेट शिवार नांदेड येथे यातील आरोपी यांनी बिना परवाना बेकायदे शिररीत्या साठवुन ठेवलेली गौन खनिज ०६ ब्रास रेती व दोन हायवा किंमती एक जेसीबी असा एकुण १ कोटी १५ लाख ३६  हजार रूपयाच्या मुद्दे मालासह साठा करून चोरटी विक्री करीत असतांना ग्रामीण पोलिसांना मिळून आला आहे 

या प्रकरणी फिर्यादी  माधव परसराम डफडे, यांनी पोस्टे नांदेड ग्रामीण  दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं ११२९ /२०२४  कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहीता २०२३ कायदा सह ४७, ४८ ज.म.सं कायदा प्रमाणे  गुन्हा दाखल केला असुन तपास पोलीस  निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पांचाळ, हे करीत आहेत

या कार्यवाही मुळे अवैधरित्या चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या संबधीताचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments