Header Ads Widget

घुंगराळ्यात महाराष्ट्रा पुढे दिल्ली हरली खंडोबा केसरीचे विजेते विजय शिंदे तर दिल्लीचे मनीष कुमारचा कुस्तीच्या दंगलीत पराजय सहन करावा लागला शेवटची आकर्षक कुस्ती वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळ्यात खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त कुस्त्याच्या दंगलीत महाराष्ट्रा पुढे दिल्ली हरली खंडोबा केसरीचे विजेते विजय शिंदे तर दिल्लीचे मनीष कुमारचा कुस्तीच्या दंगलीत पराजय सहन करावा लागला आहे 
खंडोबा केसरी शेवटची कुस्ती वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने दंगल समाप्त  करण्यात आली असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा रायाच्या कुस्तीच्या दंगलीसाठी महाराष्ट्रच नव्हे तर भारत देशाच्या काना कोपऱ्यातुन घुंगराळा येथे कुस्ती खेळण्यासाठी पैलवान आले होते 

दिल्ली येथून आलेला पैलवान मनीष कुमार यांची व महाराष्ट्राचा विजय शिंदे यांची खंडोबा केसरी अखेरची म्हणून कै.माधवराव आत्माराम पाटील सुगावे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी २१ हजाराचे १११ रुपयाचे प्रथम बक्षीस ठेवले होते

Post a Comment

0 Comments