नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील रहिवासी असलेले दिलीपराव सर्जे व सुधाकरराव नारायणराव सर्जे यांच्या मातोश्री कै.सुलोचनाबाई नारायणराव सर्जे यांचे दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी बरबडा येथे निधन झाले असून त्या मृत्यू समयी ८० वर्षाच्या होत्या
आई ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग आई मी तुला कसे विसरू आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाहीआई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते हिच आई भावपूर्ण श्रद्धांजली
तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला कै. सुलोचनाबाई नारायणराव सर्जे यांच्यावर दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी बरबडा येथे त्यांच्यावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
बरबड्याच्या ज्येष्ठ महिला सुलोचनाबाई नारायणराव सर्जे यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातू पंतु असा त्यांचा मोठा परिवार आहे

0 Comments