माधव पवार
महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून घुंगराच्या खंडोबा यात्रेच्या कुस्त्यांच्या दंगलीसाठी घुंगराळा येथे पैलवान मोठ्या प्रमाणात येतात समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी कुस्त्याची तुफानी झाली आहे
घुंगराळा येथील या दंगलीतील महाराष्ट्राच्या विजेता पैलवानालाकै.माधवराव आत्माराम पाटील सुगावे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी २१ हजाराचे १११ रुपयाचे प्रथम बक्षीस देण्यात आले आहे
आज दिनांक नऊ डिसेंबर २०२४ रोजी पशुप्रदर्शन सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे भरण्यात येत आहे
आजच संध्याकाळी जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सोलापूर येथील कलाकारांच्या माध्यमातून लावण्यांचा भारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी माहिती दिली आहे
जिल्ह्यातील घुंगराळ्याची यात्रा ही माळेगाव यात्रेच्या नंतर ह्या दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे समस्त गावकऱ्यांनी श्रीक्षेत्र खंडोबारायाचा गजर करण्यासाठी आख गाव एकत्रित पणे येऊन सदरच्या कार्यक्रमाचे दर वर्षी सहकार्याची भावना ठेवत आहे
खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्त तुफानी कुस्त्या व
बाहरदार सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे साजरे करण्यासाठी गाव एकत्र होऊन सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करते असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे

0 Comments