दक्षिण भारतातील व नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेचे कौतुक करीत नायगाव तालुक्यातील घुंगराच्या यात्रेच्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी येण्याचे मला सौभाग्य मिळाले असल्याचे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आयोजित करण्यात आलेल्या घुंगराळा येथील पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले आहे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये भरविण्यात आलेल्या पशु प्रदर्शनाच्या भव्य दिव्य अशा सुंदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर होते
तर व्यासपीठावर राजेश देशमुख कुंटूरकर मा. शिवराज पाटील होटाळकर बालाजी बच्चेवार पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार रवींद्र भिलंवडे सूर्याजी पाटील चाडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील मुख्याध्यापक अनकाडे ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे विश्वानाथ बडूरे यादी यावेळी उपस्थित होते
पशु प्रदर्शनच्या कार्यक्रमात बोलताना नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार पुढे म्हणाले की या घुंगराळा गावामध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने कुस्त्यांची स्पर्धा असो की पशुप्रदर्शन स्पर्धा असो अतिशय मोठ्या प्रमाणात संपन्न झाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह गावकऱ्यांचे कौतुक करीत ते पुढे म्हणाले की अशाच पद्धतीच्या स्पर्धा भविष्यात ही झाल्या पाहिजेत या हेतूने त्यांना व गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पशु प्रदर्शनच्या कार्यक्रमात बोलताना आयपीएस अबिनाश कुमार पुढे म्हणाले की गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी संबंधित पोलिसांना सहकार्य करावेत त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही सदरची अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मोहीम चालू केली आहे
याच कार्यक्रमात पुढे बोलताना आयपीएस अबिनाश कुमार म्हणाले की गावागावात व्यसनमुक्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून त्याच बरोबर ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठे सहकार्य करावे असे ही नांदेड जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांनी आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदनाच्या कार्यक्रमात घुंगराळा येथे आपले मत व्यक्त केले आहे

0 Comments