नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्याच्या वतीने कुस्त्याची दंगल भरवण्यात आली असून यावेळी राज्य सरकारच्या आयुष विभागाचे संचालक घुंगराळ्याचे भूमिपुत्र डॉ रामन यमलवाड,कुंटूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत पाटील सुगावे नायगाव चे गटविकास अधिकारी एल आर वांजे महिला व बालकल्याण समितीचे सदस्य किशोर नावंदे ,एम एस इ बी चे अभियंता,कृषी अधिकारी उप्पलवाड साहेब,बिलोली एस टी आगार प्रमुख निमनवाड ,तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पा.ढगे,चेअरमन श्यामराव यमलवाड यावेळी उपस्थित होते
यावेळी कुस्त्याच्या उदघाटन प्रसंगी व्हा.चेअरमन चंद्रप्रकाश पा.ढगे,सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बालाजीराव मातावाड सेवानिवृत्त कृषी अधिकारी आनंदराव यमलवाड आत्माराम यलपलवाड,शालेय समिती अध्यक्ष माधवराव पाटील ढगे केरबा पाटील सुगावे श्रीराम पाटील सुगावे संभाजीराव तुरटवाड बालाजीराव हाळदेवाड माधवराव जलदेवार यांच्यासह अनेक अधिकारी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

0 Comments