नांदेड जिल्ह्यातील सर्व सुज्ञान नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी पोस्ट करू नये असे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केले आहे
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या मार्फत सूचित करण्यात येते असुन या सर्व बाबीवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवुन असल्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व ठेवण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सहकार्य करावे असे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आविनाश कुमार यांनी आवाहन केले आहे
नांदेड पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत असल्यामुळे सुज्ञान नागरिकांनी आपत्कालीन परिस्थिती मध्ये डायल करा ११२, पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड ०२४६२- २३४७२० या नंबर वर संपर्क करावा असे ही आवाहन करण्यात येत आहे

0 Comments