राज्यात महायुतीचे दळभद्री सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या व गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही बोलत नसल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला आहे
सदरचे सरकार सत्तेत आल्या तेव्हा पासून या राज्या मध्ये नवीन नियम लागू करून शेतकऱ्यांना जाचक अट घातली सदरची केवायसी करत असताना शेतकऱ्याचे अंगठे येत नसल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान पिक विमा पंतप्रधान योजनेसह मुख्यमंत्री योजनेचे हप्ते सुद्धा जमा होत नाहीत ते बंद करण्यात आले आहेत
सरकार शेतकऱ्याचा फार मोठा पुळका करत असले तरी ई-केवायसी करण्यासाठी आडवा दांडू घालून ठेवला आहे
शेतकऱ्याचे अंगठे येत नसल्यामुळे केवायसी बंद करा अनुदानासह पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे पैसे बंद झाले तोडगा तरी तात्काळ काढा असे शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे
केवायसी करण्याच्या दोन पद्धती आहेत म्हणे एक म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी सहायकाशी संपर्क करावा कृषी सहायक त्यांच्या लॉगिन मधून शेतकरी
खातेदाराच्या आधारला जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवून ई-केवासयी करून घेतील असे सांगण्यात येते आहे
दुसरी पद्धत ऑनलाइन स्वरूपाची आहे म्हणे म्हणून सांगतात परंतु शेतकऱ्यांना कोणता ही अधिकारी व कर्मचारी बोलतच नाही असे अनेक उदाहरणं आहेत

0 Comments