Header Ads Widget

परभणी येथे संविधान स्तंभाची अवमान व तोड फोड करणाऱ्यांना पोलीसानी तात्काळ अटक करण्यात यावे या मागणीसाठी नायगावच्या तहसीलदाराना निवेदन !!

      माधव पवार 
परभणी येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न विश्व वंदनिय बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान स्तंभाची तोडफोड व आवमान करणाऱ्यांना नरधामास तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नायगावच्या तहसीलदारांना कार्यकर्त्याचे वतीने निवेदन देण्यात आले आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाचा आवामान करणाऱ्या आरोपीला धडा शिकविण्यासाठी नायागांव शहरात रॅली काढण्यात आली असून फुले शाहू आंबेडकर युवा मंच वतीने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे 

नायगाव शहरात रॅली काढण्यात आली व त्या परभणी प्रकरणातील तात्काळ अटक करून त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन कार्यकर्त्यांनी नायागांवच्या तहसीलदार यांना निवेदन सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या नावाची घोषणा देत सदरील परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे 

यावेळी साहेबराव कोपरेकर धम्मदिप भद्रे कांडाळकर
अविनाश गायकवाड सतीश वाघमारे बाळासाहेब सोनकांबळे माधव इंगळे धम्मानंद सोनकांबळे आणि सर्व नायगाव तालुक्यातील भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Post a Comment

0 Comments