देशाच्या राजकारणात देशातील नेते राजकीय भांडवल केवळ निवडणुकी पूर्ती करत असतात परंतु आपले दैवत म्हणजे आई-वडील हे आपल्यासाठी काही तरी करून जातात अशा दैवताला विसरून जाऊ नका मात्र या राजकीय पुढार्यांना नेत्यांना मात्र देव म्हणू नका असा महान संदेश प्रख्यात व्याख्याते विठ्ठलराव कांगणे यांनी कुंटूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उद्देशून केले आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात बोलताना प्रख्यात व्याख्याते विठ्ठलराव कांगणे म्हणाले की वाटावी परिस्थितीवर मात करून काही तरी नोकरी बरोबर व्यवसाय करून आई वडिलाची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा त्यानी संदेश दिला आहे
कुंटूर येथील संविधान जागृती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायगावच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड हे होते प्रमुख पाहुणे म्हणून रफिक शेख पोलीस उपविभागीय अधिकारी बिलोली पोलीस निरीक्षक कुंटूर बाळकृष्ण पाटील तर गावातील प्रमुख रुपेश देशमुख कुंटूरकर. डॉ.
विलास पवार तांडा ,मंगेश हनवटे केंद्र प्रमुख कुंटूर. सुधाकर झुंजारे. के .टी. हमनते.प्रकाश महिपाळे, गंगाधर ढवळे पत्रकार, अमोल जोंधळे तालुका अभियान व्यवस्थापक, गौतम जोंधळे सातेगावकर रोहिदास गायकवाड सैनिक, मधुकर जोंधळे विक्री माळ सैनिक, गंगाधर झगडे सैनिक भारतीय बौद्ध महासभा, बाळू दगडूमवार कवी लेखक , देवराव नारे ग्रामपंचायत सदस्य डोंगरगाव, विनोद झुंजारे, गावातील प्रमुख व्यक्ती महिला
पुरुष व्यक्ती उपस्थित होते. यावेळी गावातून नागरिक महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होते . यावेळी उत्कृष्ट तलाठी .एस. काळे . उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी मिलिंद जोंधळे. उत्कृष्ट पोलीस एस आय निकम . उत्कृष्ट पत्रकार देवदास जेठेवाड. तानाजी शेळगावकर पत्रकार, उत्कृष्ट महिला बचत गट महालक्ष्मी . गिरजा माय महिला बचत गट यांच्या उत्कृष्ट घोंगडी व्यवसाय म्हणून उत्कृष्ट म्हणून त्यांना यावेळी सन्मान
चिन्ह ट्रॉफी व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व नागरिकांना व महिला पुरुषांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली संविधान हे महिला पुरुष आवाना एकत्र व सर्वांना समान अधिकार देण्यात आलेला आहे . त्यामुळे संविधानाने जनजागृती होणे गरजेचे असून अशी कार्यक्रम घेणे. ही गरजेचे आहे . बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व संघर्ष करा हा मूलमंत्र सर्वांना दिला आहे.
त्या मूलमंत्र्याप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षण शिकवा नोकरी व्यवसायामध्ये कामाला लावा व आपल्या परिवाराची उन्नती साधा असे मत तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली. यावेळी गावातील व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू दुगडूमवार,तर प्रास्ताविक विनोद झुंजारे यांनी केले . या
कार्यक्रमाचे आयोजक बालाजी हणमंते, माधव धडेकर, अनिल कांबळे ,मालोजी झगडे, प्रकाश महिपाळे, साहेबराव धसाडे, सिद्धार्थ गजभारे, गौतम जोंधळे सातेगावकर यावेळी परिसरातील भारतीय बौद्ध महासभेचे सैनिक उपस्थित होते . त्यांनी या कार्यक्रमात आलेल्या सर्व महिला पुरुष व बालकांचे सुरक्षेची जबाबदारी घेतली होती त्यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .

0 Comments