हिमायतनगर विदर्भाला जोडणारा तालुक्यातून जाणारा पळसपूर डोल्हारी सिरपल्ली हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तत्कालीन खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाला होता . आणि दणक्यात कामाला सुरुवातही झाली पण नंतरच्या काळात अनेक कारणामुळे वादाच्या भौऱ्यात अडकलेला पाहावयास मिळत आहे. संबंधित गुत्तेदाराने मागील चार वर्षापासून या कामास सुरुवात केली सदर मार्गावरील रस्ता पूर्णतः उकरून अर्धवट मटेरियल टाकले. पण काम पूर्ण करण्यास मात्र गुत्तेदाराकडून टाळाटाळ केल्या जात आहे. कामही अगदी निकृष्ट दर्जाचे होत आहे. हिमायतनगर ते पळसपुर डोल्हारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला. परंतु चार वर्षाचा कार्यकाळ संपला तरीही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. कामाचा अवधी संपुष्टात येऊनही हे काम पूर्णत्वास आले नाही.गुत्तेदाराने या विभागाचे कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता व तसेच तत्कालीन उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांना मॅनेज करून सुधारक मूल्यांकन करून निधी हडप केला.असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मात्र कामाची अवस्था जैसे थे असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत सदरील रस्त्यावरील गिट्टी पूर्णतः उखडल्यामुळे सदरील रस्त्यावरून दुचाकी चालवणे सुद्धा दुरापास्त झाली आहे .रस्ता पूर्ण करण्यासाठी पळसपुर, डोलारी, सिरपल्ली येथील नागरिकांनी पाच दिवस साखळी उपोषण करून सुद्धा शासनाकडून सदरील रस्ता पूर्ण करण्यासाठी कुठलीही उपाययोजना न करता गुत्तेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार अधिकारी कर्मचाऱ्याकडून केल्या जात आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाला विचारल्या जात आहे .

0 Comments