Header Ads Widget

केवायसी साठी लाभार्थ्यास पन्नास रुपयाची मागणीचे काय झाले ? पुरवठा अधिकाऱ्याकडे चौकशीची केलेली मागणी गुलदस्त्यात का ?

      नागोराव शिंदे 
हिमायतनगर  तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील स्वस्त धान्य दुकानदार हे राशन लाभार्थ्याकडून ई केवायसी  करण्यासाठी ५० रुपयाची मागणी करत असल्याचा  व्हिडिओ एक महिन्याखाली सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिरंजनी येथील लाभार्थ्यांनी संबंधित दुकानदारा विरोधात जवळपास सव्वा महिना आधी महसूलच्या पुरवठा निरीक्षकाकडे  लेखी तक्रार देऊन केली.

 पण  ७/११/२०२४रोजी केलेल्या तक्रारीवर पुरवठा निरीक्षकांनी कुठलीही कारवाई न करता राशन दुकानदारास अभय दिले की काय? अशी चर्चा  स्वस्त धान्य कार्ड लाभार्थ्यांमध्ये  होताना दिसून येत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाकडून राशन कार्ड लाभार्थ्यांनी आप आपल्या राशन दुकान वर जाऊन मोफत ई-केवायसी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे

 त्यानुसार हिमायतनगर तालुक्यातील मौजे सीरंजनी येथील अनेक राशन लाभार्थी हे गावातील राशन दुकानदार विजय नागनाथ चिंतावार यांच्याकडे ई केवायसी करण्यासाठी जात आहेत .तेव्हा संबंधित दुकानदारा कडून राशन लाभार्थ्यांनची मिळवणूक होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे .उलट राशन लाभार्थ्यांनाच दुकानदाराकडून उद्धट वागणूक मिळत असल्याची तक्रार सात नोव्हेंबर रोजी दिगंबर पांडुरंग कात्रे यांनी हिमायतनगर येथील तालुका पुरवठा निरीक्षकाकडे केली होती

पण अद्याप पर्यंत सबंधित राशन दुकानदारांवर कुठलीही कारवाई झालेली नाह असे लाभार्थ्या कडून सांगण्यात आले आहे .दर महिन्यातील तीनच दिवस सीरंजनी गावातील लाभार्थ्यांना संबंधित दुकानदाराकडून राशन मिळते त्या वेळात जर लाभार्थ्यांनी आपलं राशन घेऊन गेले नाहीत तर लाभार्थ्यांना सरळ सरळ तुम्हाला राशन उपलब्ध नाही अशी ऊडवा ऊडवीची उत्तरे दुकानदाराकडून लाभार्थ्यांना मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे

त्यामुळे गोरगरीब राशन लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे मोफत चे राशन मिळण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत व राशन दुकान चालू असताना दुकानच्या खुर्चीवर बसून रोज तो धुम्रपान करत संबंधित राशन लाभार्थ्यांना ई-केवायसी च्या नावाने पन्नास रुपये द्या सर्वजण घेत आहेत 

असे म्हणताना चा व्हिडिओ संबंधित राशन लाभार्थ्यांनी चित्रीकरण केला आहे व तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे ई -केवायसी च्या नावाने तक्रारदार दिगंबर कात्रे यांच्या सह गावातील इतर बऱ्याच लाभार्थ्याकडून  ५० ५० रुपये घेतले आहेत 

अशी लेखी तक्रार व संबंधित व्हिडिओ चित्रीकरणाची डीव्हीडी सी.डी. तालुका पुरवठा निरीक्षकाला देऊन सुद्धा व मागील काळात पुरवठा निरीक्षकांकडे  चकरा मारूनही संबंधित राशन दुकानदारावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं लागतं की काय ?असे मत तक्रारदार दिगंबर पांडुरंग कात्रे यांनी व्यक्त केले आहे .

Post a Comment

0 Comments