Header Ads Widget

नायगावचे आमदार राजेश पवार यांना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पद द्यावे जनतेची अपेक्षा !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे दुसऱ्यांदा निवडून आलेले  आमदार राजेश पवार यांना नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी व नायगाव विधान सभा मतदार संघाच्या विकासासाठी महायुतीने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून लाल दिवा द्यावा अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे 

जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक अतिशय लक्ष वेधी झाली असल्यामुळे या मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी या मतदार संघातील रस्त्याच्या कामासाठी कोठ्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता बऱ्याच पैकी प्रमाणात विकास झाला आणि त्यातील उर्वरित काम प्रगती पथावर चालू असल्याचे ग्रामीण भागात स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

जिल्ह्याच्या व नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाच्या माध्यमातून नाव लौकिक असलेले या नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांना महायुतीने मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना यांना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पद बहाल करावे असे जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे 

नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नंतर जिल्ह्याला जिल्ह्यातील आमदाराला पालकमंत्री हे पद देण्यात आले नाही त्यासाठी महायुतीने विचार पूर्वक नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांना लाल दिवा विकासाच्या दृष्टिकोनातून दिला पाहिजे असे स्पष्ट मत जनतेने व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments