Header Ads Widget

घुंगराळ्याच्या यात्रेत आकर्षण घोड्याच्या प्रदर्शनात कुठला ही पक्षपात केला जाणार नाही योग्य तेच घोडा निवडला जाईल - वसंत पाटील सुगावे !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व गावकऱ्याच्या वतीने यात्रेची जयत तयारी चालू करण्यात येत असून यंदा या यात्रेत प्रथमच घोड्याचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे घुंगराळा येथे प्रदर्शनाखाठी घेऊन आलेल्या घोड्याच्या निवडीत कुठला ही पक्ष पात केला जाणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षांचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील घुंगराळा येथील यात्रा ही माळेगाव यात्रेच्या नंतर जिल्ह्यातील ही खंडोबा रायाची यात्रे ही दुसऱ्या क्रमांकाची असल्यामुळे मैदानी खेळ म्हणजे कुस्त्याच्या दंगलीतील विजयी पैलवान यांना उत्कृष्ट दर्जेचे बक्षीस वितरण मोठया स्वरूपात दर वर्षी केल्या जात आहे 

गेल्या तीन ते चार वर्षा पासून तालुक्यातील घुंगराळा नगरीत यात्रेची मोठया प्रमाणात जयत तयारी केली असली तरी पशु प्रदर्शन घेण्यात आले नव्हते परंतु या वर्षी लंपी वायर्सचा कसल्याच प्रकारचा धोका नसल्याम पशु प्रदर्शना बरोबर घोड्याचे प्रदर्शन भरविण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांनी केला आहे 

व सदरची यात्रा मोठया प्रमाणात झाली पाहिजे या डोळस विचाराने गावकऱ्याना विचार घेऊन घोड्याचे  आकर्षण प्रदर्शन भरविले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments