जिल्हासह नायगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे तुरीचे पीक धोक्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर पडली प्रचंड अळी - प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदरच्या शेतकऱ्यानी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून केली आहे
राज्यात सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे शेतकरी राजाकडे कोणी ही लक्ष देण्यास तयार नाही प्रशासन तर दे रे हरी पलंगावरी म्हणण्याच्या तयारीत असल्याचे शेतकऱ्यातून बोलल्या जात असले तरी सदरच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे
गेल्या वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला अद्याप पीक विमा व अनुदान महायुतीचे दळभद्री सरकार दिले नाही ज्या शेतकऱ्याचे अनुदान असो पीक विमा असो अथवा पंतप्रधान योजने बरोबर मुख्यमंत्री योजनेचे पैसे केवायसीच्या नावाखाली रोखून ठेवले आहे
सध्याच्या परिस्थितीमध्ये नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळी पडले असल्याने सदरच्या तुरीच्या पिकाचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक झटका बसत असल्याचे शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे

0 Comments