नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नेहमी चालणाऱ्या हद्दीत ७० अँटोची ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह त्यांच्या पोलीस टीमने आटो तपासनी करत सदरचे आटो ताब्यात घेतले आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरच्या चालका कडून कागदपत्रे तपासणी करून कागद पत्रे नसणाऱ्या चालकांवर कार्यवाही चालूच ठेवली असल्याचे स्पष्ट चित्र ठाण्याच्या हद्दीत दिसून येत आहे
ताब्यात घेतलेल्या सर्व ऑटो चालकानाला भविष्यातील चांगल्या वर्तुणुकीची शपथ दिल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या रमामाता आंबेडकर चौक व बळीरामपुर एम आय डि सी भागात विना परवाना ,गुन्हे दाखल असणारी वाहने, ज्यांच्यावर चलान करण्यात आलेले आहे
पेंडिंग चलान वाली वाहने तपासणी १८ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आली असून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने ग्रामीण हद्दी मध्ये वाहन तपासणी दरम्यान ७० ऑटो ताब्यात घेण्यात आले आहे
सदरच्या ऑटो चालका विरुद्ध कार्यवाही चालूच राहणार असल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दबंग पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले असून सदरील कागद पत्रे तपासणी करून कागदपत्राची पुरर्तता नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात येते आहे

0 Comments