Header Ads Widget

बरबड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या एका वर्षा पासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त कुंटूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना दोन ठिकाणची जबाबदारी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !!

       माधव पवार 
राज्यातल्या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या ठिकाणचे पद रिक्त असल्यामुळे चिंतेचा विषय बनला असून या बरबड्याच्या प्रार्थमिक आरोग्य केंद्रात गेल्या एका वर्षा पासून महत्वाचे पद म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असताना सुद्धा आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेऊन बसले आहे 
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांनी अशा महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे आरोग्य विभागाचा दर्जा वाढवण्यासाठी व रिक्त पद भरण्यासाठी प्रयत्न करतील का ? असा सवाल जनसामान्य माणसातून केला जात आहे 

बरबडा हे गाव अंदाजे १० ते १५ हजार लोक संखेची वस्ती असताना या ठिकाणचे रिक्त पद भरण्यास तयार नसल्यामुळे जन सामान्य माणसासह रुग्णातून संताप व्यक्त केला जात आहे 

तालुक्यातील प्रार्थमिक आरोग्य केंद्र कुंटूर या ठिकाणचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांना बरबडा आरोग्य केंद्राची जबाबदारी दिल्यामुळे त्यांना ताण-तणाव निर्माण होताना दिसत असले तरी बरबडा व कुंटूर दवाखान्याची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत आहेत  

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील प्रार्थमिक आरोग्य केंद्र बरबडा या महत्वाच्या दवाखान्यां मध्ये गेल्या वर्षा पासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने कुंटूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे याना दोन ठिकाणची जबाबदारी देण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments