Header Ads Widget

रामतीर्थ पोलिसाची दमदार कामगिरी वेळेत घटना स्थळी रवाना झाले म्हणून आरोपी सापडला सासूचा गळा चिरणाऱ्या जावयाला गच्छी पकडून बसविले पोलीस गाडीत !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी अंदाजे ४ ते पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान जावई आरोपीनी तूझ्या लेकीला धाडत नाहीस म्हणून रागाच्या भरात सासूच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता 

रामतीर्थ पोलीसांना सदरची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना होऊन जावई आरोपीला रामतीर्थ पोलिसानी गच्ची पकडून पोलीस गाडीत बसविले आहे 

तालुक्यातील नरसी येथील रहिवासी असलेल्या पारूबाई लक्ष्मणराव रेपनवाड वय ६५ या महिलेला तिचा आरोपी जावई अशोक किशन धोत्रे राहणार नांदेडच्या उल्हासनगर वडारवाडा यानी माझ्या पत्नीला माझ्या सोबत नांदायला का ?  पाठवत नाही म्हणून सासूची जावई आरोपीने हत्या केली होती रामतीर्थ पोलीसाच्या दमदार कामागिरी केल्या नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे 

मयताची मुलगी उज्वला अशोक धोत्रे राहणार बजरंग नगर नरसी  येथील नरसीच्या पोलीस चौकीत तात्काळ घडलेल्या घटनेची माहिती दिली असल्यामुळे पोलीस कसल्याच प्रकारचा विचार न करता घटना स्थळी रवाना होऊन आरोपी ताब्यात घेतले आहे 

रामतीर्थ पोलिसांनी घटना स्थळी तात्काळ जाऊन सदरच्या घटनेची पाहणी केली व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयत पारूबाई लक्ष्मणराव रेपनवाड यांना जखमी अवस्थेतील महिलेला पोलिसांनी जल्द गतीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु जाग्यावरच तिचा मृत्यू झाला होता 



Post a Comment

0 Comments