Header Ads Widget

विद्युत वितरण कंपनीची लूट करणाऱ्या गुत्तेदाराचे टेंडर रद्द करा नादुरुस्त सिंगल फेजची डीपी पाठवून देण्याचा सपाटा चालूच !!

      माधव पवार 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे नांदेडचे अधीक्षक अभियंता यांच्या बेजबाबदार पणामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावा गावात नादुरुस्त सिंगल फेजची डीपी पाठवून देण्याचा सपाटाच लावला असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यानी कॉन्ट्रॅक्टरचे टेंडरच रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे 

विद्युत वितरण कंपनीची लूट करणाऱ्या गुत्तेदाराचे टेंडर रद्द करा नादुरुस्त सिंगल फेजचे डब्बे पाठवून देण्याचा सपाटा चालूच असल्यामुळे उत्कृष्ट काम पणे काम करणाऱ्यासह कर्मचाऱ्याना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे 

विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असलेले व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठया प्रमाणात नाराज होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत असले तरी गावातील नागरिकाच्या रोषाला नादुरुस्त डीपीमुळे सामोरे जावे लागत आहे 

देगलूर येथे दुरुस्त करून येणारी सिंगल फेजची डीपीत कधी ऑइल टाकून येते तर कधी सदरच्या सिंगल फेजच्या डीपीत ऑइल न टाकताच डीपी गावात आणून बसाविल्या जात असल्यामुळे दोन ते तीन मिनिट सुद्धा सिंगल फेजची डीपी चालत नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारी सुद्धा हातबल झाले आहे 

विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता नांदेड यांच्यासह देगलूरच्या अधिकाऱ्याचे मुळीच लक्ष कॉन्ट्रॅक्टरवर नसल्यामुळे त्या कॉन्टॅक्टर चा मनमानी कारभार वाढला असल्यामुळे गावा गावात नादुरुस्त सिंगल फेजची डीपी पाठवून देऊन विद्युत वितरण कंपनीची दिशाभूल व लूट करत असल्याच्या स्पष्ट चित्र सदरच्या नादुरुस्त सिंगल फेजच्या डीपी वरून दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments