नायगाव शांती निकेतन माध्यमिक विद्यालय रुई शाळेत शासनाच्या परिपत्रकानुसार परसबागेची लागवड करण्यात आली.आठ दिवसापासून तालुक्यातील परसबागेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे
त्या सर्वेक्षणातून शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालय रुईच्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे. परसबागेत टमाटा, वांगा ,मिरची ,पालक, कोथिंबीर ,मुळा, काकडी, तुळस ,गोड लिंबू, कढीपत्ता, शेवगा ,अशा शालेय पोषण आहार उपयोगी भाजीपाला, त्याचबरोबर इतर आयुर्वेदिक वनस्पती कोरफड, तुळस, कडुलिंब ,वड, पिंपळ सप्तपर्णी वृक्ष, परसबागेत आहेत.परसबागेची जोपासना करण्यासाठी बागेला मुबलक प्रमाणात पाणी, सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला आहे
त्या बागे साठी कुंपण ,दार, कडी, कुलूप, औषध फवारणीसाठी पंप ( पिचकारी ) इत्यादी साहित्याची दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सकस आहाराबरोबरच उत्तम शेतीचे संस्कार देण्यात येत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक बनाळीकर सर, हिवराळे सर, आणि बालाजी जंगीलवाड यांच्या देखरेखी खाली परसबाग फुलते आहे
रुई (बू) व पंचक्रोशीतील नागरिकांनी परसबागेचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजेशजी देशमुख कुंटूरकर साहेब,संस्थेचे उपाध्यक्ष मां.रुपेश देशमुख कुंटूरकर साहेब आणि संस्थेचे सचिव मा. भाऊसाहेब देशमुख गोरठेकर यांनी फोन करून अभिनंदन केले आहे.

0 Comments