नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांनी घरकुलाच्या बाबतीत मोठी दक्षता घेऊन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तात्काळ पैसे जावेत म्हणून प्रयत्न करीत आहेत
परंतु पंचायत समितीतील बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी ज्या घरकुल धारकाला शासनाचे घरकुल मंजूर झाले आणि त्यांचा पहिला हप्ता टाकत असताना लाभार्थ्यांचे बँक खाते व्यवस्थित न बघता कुठल्या तरी अनोळखीच्या बँक खात्यात पैसे टाकून मोकळे होत आहेत
नायगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागात "आंधळं "दळतंय कुत्र पिट खातोय " लाभार्थाच्या नावावर पडणारा घरकुला हप्ते दुसऱ्याच्या बँक खात्यात कस काय जातात ? गटविकास अधिकाऱ्यानी चौकशी करावी अशी मागणी लाभार्थथातुन केली जात आहे
पंचायत समिती मध्ये ज्या कर्मचाऱ्यांना घरकुलाचे हप्ते जमा करण्यासाठी नेमणूक केली त्या कर्मचाऱ्या कडून लाभार्थ्यांना समाधान कारक उत्तर ही मिळत नाही घरकुलांचे पैसे आमच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत ती कधी होणार अशी विचारणा लाभार्थी करत आहेत
परंतु ते कर्मचारी सदरच्या लाभार्थ्याला उडवा उडवीचे उत्तर देऊन इकडे जा तिकडे जा त्याला भेटा या भेटा असे सांगून वेळ मारून नेत आहेत
नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी सदर विभागात काय चाललय नेमके ते चौकशी करावी अशी मागणी लाभार्थ्यातून केली जात आहे

0 Comments