Header Ads Widget

प्रा.रवींद्र पाटील चव्हाण जिल्ह्याचे खासदार तर राजेश पवार नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार !!

      माधव पवार 
प्रा.रवींद्र पाटील चव्हाण जिल्ह्याचे खासदार तर राजेश पवार नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार आहेत 

राज्यात व केंद्रात सरकार कोणाचे ही असो नांदेड जिल्ह्याच्या परिपूर्ण विकासासाठी व शेतकऱ्याच्या हितासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून विकास करण्यासाठी १०० टक्के निधी मंजूर करून विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्ह्याचे लाडके खासदार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे 

जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात निधी देण्यासाठी कसल्याच प्रकारचे राजकारण केले जाणार नाही व जन सामान्य शेतकऱ्याच्या संपर्कात राहून त्यांच्या आडी अडचणी सोडविण्यासाठी मोठे प्रयत्न केले जाणार असल्याचे ही जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे 

काल परवाच लोकसभा पोटनिवडणूकीत जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत 

याच नायगाव मतदार संघातून याच मतदार संघांचे दुसंऱ्यादा या मतदार संघातून निवडणुन येऊन राजेश पवार हे आमदार झाले असल्यामुळे सदरच्या आमदारानी राजकारण बाजूला ठेवून या मतदार संघाच्या विकासाठी मोठे प्रयत्न करावे जन सामान्य माणसाच्या संपर्कात राहावे अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments