गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान देऊन गोरगरीब दलित बहुजन अल्पसंख्यांक वर्गांना न्याय देण्याचे ज्यांनी काम केले
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शेळगाव छत्री येथील श्रीमती रेखा बनसोडे देवकर यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी नियुक्ती केली असून निवडीचे पत्र नवनिर्वाचित खा.प्रा.रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रमाणिक पणाने व पारदर्शकपणे सामाजिक काम केले की त्या कामाची बढती राजकीय रूपात होते
मौजे शेळगाव छत्री येथील श्रीमती रेखा हरिबा बनसोडे देवकर हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार रेखा देवकर यांची नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती जिल्हाध्यक्ष मा आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केली
असून पक्षाच्या ध्येय धोरणा नुसार काम करावे तसेच सर्व समाजाच्या व जाती-धर्माच्या घटकांना सोबत घेऊन व पक्षशिस्त पालन करून नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षांचे संघटन मजबूत करावे अशा आशयाचे निवडीचे पत्र नवनिर्वाचित खा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रेखा बनसोडे यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

0 Comments