Header Ads Widget

निवडणुकीच्या अनुषंगाने खेड्या पाड्यात दारूचे बॉक्स आले नसल्याने तळीराम दारूच्या शोधात !!

        माधव पवार 
निवडणूक कोणत्या ही असो मतदारांना वळविण्यासाठी राजकीय पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते व गावातील संबंधित पुढारी यांच्याकडे दारूचे बॉक्स आले नसल्यामुळे तळीराम संबंधित गावांतर्गत पुढार्‍याकडे शोध घेऊन इतरत्र दारूच्या शोधात असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे लोकसभेच्या निवडणुका असो कीं विधानसभेच्या निवडणूक असो अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुका आणि सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका असो देशी दारूच्या बाटल्यात देऊन खेड्यापाड्यात मत वळविण्याचा प्रयत्न नेहमी होत असते असे अनेक चित्र निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या पूर्वी दिसून येत होते 

परंतु या लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खेड्यापाड्यात देशी दारूचे बॉक्स आले नसल्याने अनेक तळीराम  दारूच्या शोधात आहेत 

खेड्यापाड्यात देशी दारूचा महापूर करतात परंतु लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत खेड्यापाड्यात येणाऱ्या दारूचे बॉक्स आले नसल्यामुळे तळीराम देशी दारूच्या शोधात असल्याचे दिसत आहेत 

Post a Comment

0 Comments