Header Ads Widget

लोकसभा पोटनिवडणुकीत प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण तर नायागांव विधानसभा मतदार संघातून मीनलताई खतगावकर १०० टक्के विजयी होणार जनतेचा ठाम विश्वास !!

     माधव पवार 
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे व महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय दिवंगत खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांनी नायगाव विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खातेगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर या दोन्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा शंभर टक्के विजय होईल असा विश्वास जनसामान्य माणसातून केला जात आहे

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण  यांना नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी महाविकास आघाडीने मोठी संधी दिली असल्याने सदरच्या निवडणुकीत प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार असल्याचे जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे

महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खातगावकर या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या महिला उमेदवार असल्याने या मतदार संघातील महिला उमेदवार यांच्या विजयासाठी मतदारासह महिला मतदार डॉ मीनलताई खतगावकर यांना या पुढचा आमदार म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व करतील असा विश्वास जन सामान्य माणूस करीत आहे 

लोकसभा पोटनिवडणुकीत प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण तर नायागांव विधानसभा मतदार संघातून  मीनलताई खतगावकर १०० टक्के विजयी होणार जनतेचा ठाम विश्वास जनतेनी केला आहे 

Post a Comment

0 Comments