Header Ads Widget

माझी गरिबी हीच माझी ताकद बरबड्याच्या जाहीर सभेत डॉ.माधवराव विभुते यांचे मत !!

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात दमदार इंट्री केलेले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ माधवराव विभुते यांनी नायगाव तालुक्यातील बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलताना डॉ विभुते म्हणाले कीं माझी गरिबी हिच माझी ताकद असल्याचे मत व्यक्त केले आहे 
नायगाव विधानसभा मतदार संघात एका बाजूने धन शक्ती व धन दांडगे उमेदवार रिंगणात असताना सुद्धा त्यांना टक्कर देण्यासाठी जन सामान्य कुटूंबात जन्मास आलेले व आरोग्य सेवेच्या माध्यमातून जन सामान्य माणसाची सेवा करणारे डॉ. माधवराव विभुते नायागांव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उतरले आहे 

८९ विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते यांनी त्यांच्या प्रचाराची गती वाढविली असल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ही त्यानी बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते

Post a Comment

0 Comments