राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची मुदत जून २०२१ मध्ये संपली असताना सुद्धा निवडणुक आयोग सदरच्या निवडणुका घेण्यास तयार नसून या निवडणूक आयोगाला लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका घेता येते तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका का ? घेता नाहीत असा प्रश्न जनतेनी आता उपस्थित केला आहे
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या तीन ते चार वर्षे रखडल्या असताना सुद्धा निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक घेतल्या असून त्यानंतर सध्याच्या परिस्थितीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बाजूला ठेवून निवडणूक विभाग आता विधानसभा निवडणूका जाहीर केल्या आहेत
गेल्या पाच वर्षांखाली विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका ही झाल्या आणि विधानसभा निवडणुका ही होत असल्या तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कधी घेणार असा प्रश्न चर्चेला जात आहे
राज्यात निवडणूक आयोगाला लोकसभा व विधानसभा घेता तर मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका का ? घेता नाहीत जनतेनी सवाल केला असला तरी गेल्या चार वर्षा पासून जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या कार्यालय वाऱ्यावर आहेत

0 Comments