नायगाव प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणुका चा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असला तरी ८९ नायगांव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार गंगाधर कोत्तेवार यांच्या प्रचाराला वेग आला असून त्यात त्यांना ठिकठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
अपक्ष उमेदवार गंगाधर कोत्तेवार यांचे प्रचारकर उमरी, धर्माबाद, नायगांव, या तिन्ही तालुक्यातील प्रत्येक गावभेटी तथा प्रत्यक्ष मतदारांना भेटून प्रचार करताना आढळून येत आहेत.
सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेणारा एक होतकरू कार्यकर्ता म्हणून गंगाधर कोत्तेवार यांच्याकडे बघितले जाते.समाजातील वंचित घटकातील समूहाच्या समस्या साठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या दरबारी मांडत आपलं नेतृत्व मतदार संघात तयार केलं. याचं कारणामुळे मतदार कोतेवार यांच्या कडे वळत आहे.
हा वाढता प्रतिसाद मात्र काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.मीनल खतगावकर यांचे डोके दुःखी ठरणारा आहे
कारण या कोत्तेवार हे दलित समाजाचं नेतृत्व करतात.दलित समाजातील मातंग जमात ही वंचित बहुजन आघाडी यांना वगळता काँग्रेस पक्षाचे हक्काचं मत असे मानले जाते. आणि हेच मत कोत्तेवार यांच्या पारड्यात पडणारं आहे हे निश्चित.

0 Comments