Header Ads Widget

नको राष्ट्रवादी, नको काँग्रेस नको भाजप नको शिवसेना फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच प्रचंड मतांनी विजयी करा .ॲड प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन !!

      माधव पवार 
गेल्या स्वतंत्र्याच्या काळापासून म्हणजे ७० वर्षापासून काँग्रेस पक्षाने देशाचे वाटोळे केले असले तरी त्यापेक्षा भाजपने देशातच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये राजाचे वाटोळे केले आहे 

महाविकास आघाडीच्या व महायुतीला लोकशाहीच्या माध्यमातून जागा दाखविण्यासाठी नको राष्ट्रवादी, नको काँग्रेस नको भाजप नको शिवसेना नको फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच प्रचंड मतांनी विजयी करा असे ॲड प्रकाश आंबेडकर यांनी तमाम मतदाराना आवाहन केले आहे.

सत्तर वर्षाच्या काळात या देशावर काँग्रेस पक्षाची राजवट होती या सदरच्या राजवटी मध्ये देशाचे वाटोळे केले असे बोंब महायुतीच्या  माध्यमातून ठोकल्या जाते परंतु त्यापेक्षा ही देशाचं वाटोळ करणारे ह्या देशातले भाजप सरकार यांनी शेतकऱ्या समोर महागाई भडका वाढवून जनसामान्य माणसाला वेठीस धरले आहे 

राज्यातून या महाविकास आघाडीच्या उमेदवारासह महायुतीच्या उमेदवाराला मतदानाच्या ताकती मधून हद्दपार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे




Post a Comment

0 Comments