राज्यासह नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नायागांव विधानसभा मतदार संघात अचानक म्हणजे फॉर्म इड्रॉल करण्यासाठी शेटच्या दिवशी माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव शिरीष गोरठेकर यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जरांगे फॅक्टरच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती तर गोरठेकराचे चिरंजीव शिरीष भाऊ यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केल्या अनेक राजकीय पक्षाच्या उमेदवारात धास्ती निर्माण झाली होती परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज मागे मतदारात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या रणसंग्रामात काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी दाखल केली तर मा. राजेश पवार यांनी महायुती कडून उमेदवारी दाखल केली आणि वंचित बहुजन आघाडी कडून डॉ माधवराव विभुते यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे
८९ नायगाव विधानसभा मतदार संघाचे अचानक राजकीय समीकरण बदल्यामुळे यांचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो असा अंदाज व चर्चा आता जागो जागो केली जात असून या निवडणुकीच्या रणसंग्रामात डॉ मीनलताई खतगावकर व मा. राजेश पवार. डॉ माधवराव विभुते अशी तिरंगी लढत होणार आहे

0 Comments