नायगाव विधानसभा मतदारसंघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना विजयाची संधी असताना सुद्धा अखेर समाजाच्या भावनेपुढे त्यांना हार मानावी लागली असल्याचे मत होटाळकर यांनी झिकिंग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत व्यक्त केले आहे
नायगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रणसंग्राम गाजवण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण शिवराज पाटील होटाळकर यांनी मोठी तयारी केली होती परंतु या नायगाव विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालेल असे अनेकांना अपेक्षा होती परंतु मनोज जरांगे यांनी निर्णय घेऊन तमाम मराठा अपक्ष उमेदवारांची दिशाभूल केली आहे
राज्यातल्या विधानसभा निवडणुकी मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत होऊ नये म्हणून मनोज जरांगे यांनी असा निर्णय घेतला असावा असा संताप जनक सवाल आता मतदार व जनता करीत आहे
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी अपक्ष उमेदवारी माघार घेतल्या मुळे मतदाराच्या अपेक्षा भावनेच्या बाहेर गेल्या आणि मा. होटाळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले असल्यामुळे स्वतः मा. पाटील सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे
समाजाच्या भावने पुढे मी हरलो माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचे भावनिक मत व्यक्त करून अपक्ष उमेदवारी घेतली माघार घेतली असल्यामुळे हजारो कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

0 Comments