Header Ads Widget

नायगाव विधानसभा निवडणुकीत कमळाबाईच्या प्रेमात पडू नका माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन !!

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी दरम्यान माझ्या कार्यकर्त्यांनो कमळाबाईने आपणाला खूप त्रास केलाय तिच्या प्रेमात पडू नका असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आयोजित केलेल्या दीपावली निमित्त स्नेह भोजनाच्या कार्यक्रमात ते केले आहे 

नायगाव विधानसभा निवडणूकींच्या रिंगणातून बाहेर निघालेले व पडलेले माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव येथे दिपवाळीच्या निमित्ताने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करून कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते त्यावेळी ते बोलत होते 

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी मतदान करू नये माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या सदरच्या स्नेह भोजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन केले आहे

सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो ही कोणी  उमेदवार आम्हाला परिपूर्ण आश्वासन देईल व पाठी मागे राहण्यासाठी आम्हाला तयारी दाखविल आम्ही त्यांच्या पाठी मागे राहू असे ते म्हणत पुढे म्हणाले की नायगाव मतदार संघात मराठा समाजाचे मतदान एक लाख आठ हजार असल्यामुळे त्यापैकी सत्तर हजार मतदान एकाच उमेदवाराला झाले पाहिजे असे ही ते म्हणाले आहे

दीपावली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातून बोलताना माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर म्हणाले की राजेश पवारानी जिनिंगचा विषय काढला त्या राजेश पवार च्या बुद्धीची मला क्यू येते असे म्हणून आमदाराचा चांगलाच समाचार होटाळकर यांनी घेतला आहे 

Post a Comment

0 Comments