नायगाव मतदार संघांचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ माधवराव विभुते यांनी निवडणुकीच्या प्रचाराची गती वाढविली असल्यामुळे त्यांच्या प्रचाराला चांगलीची गती मिळाली आहे
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते यांनी नायागांव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले असून या मतदार संघासाठी प्रथमच सदरची उमेदवारी वंचित बहुजन आघाडी कडून दाखल केली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात प्रचार करण्यासाठी म्हणजे नायागांव तालुक्यात त्यांचा प्रचार दौरा चालू करण्यात आला असल्यामुळे त्यांच्या प्रचारात गती मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
या मतदार संघात जन सामान्य कार्यक्रता असलेले डॉ माधवराव विभुते हे चौरंगी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ही तगडे असताना सुद्धा त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात रणशिंग फुकले आहे

0 Comments