Header Ads Widget

नोटामुळे प्रत्येक उमेदवाराला बसू शकतो झटका मतदारानी अचूक मतदान करण्याची गरज !!

       माधव पवार 
नोटा म्हणजे या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारा तर्फे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करतांना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा देण्यात आली आहे. 

राज्यात विधानसभा निवडणूक तर नांदेड जिल्हात लोकसभा पोटनिवडणूक असल्यामुळे व दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे मतदान यंत्रा वरील नोटाच्या बटनमुळे अशा अनेक रिंगणातील उमेदवाराला झटका बसू शकतो त्यासाठी मतदान करताना मतदारांनी शांत पणे अचूक मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे 

यंत्राचे वर डकविलेल्या यादीतील उमेदवारां पैकी कोणत्या ही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास वरील पैकी कोणी ही नाही हा पर्याय वापरण्यासाठी या बटण कळचा उपयोग केला जातो आहे 

ही कळ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांच्या यादीचे सर्वात शेवटी असते सन १९९० च्या दशका पासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागली आहे 

परंतु नोटा यंत्रात येण्यासाठी २०११ हे वर्ष उजडावे लागले अशा प्रकारचे मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य झाल्या आहेत ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारां पैकी कोणाला ही मत द्यायचे नसेल तर वरील पैकी कोणी ही नाही नोटा हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले आहे 

जर नोटा हा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही अधिक असेल तर ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते हे मात्र सत्य आहे 

नोटामुळे प्रत्येक उमेदवाराला बसू शकतो झटका मतदारानी अचूक मतदान करण्याची गरज आहे 

Post a Comment

0 Comments