Header Ads Widget

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण तर डॉ मीनलताई खतगावकर यांच्या पाठीशी प्रचंड जन शक्ती !!

       माधव पवार 
महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नांदेड लोकसभा पोट निवडणुकीचे उमेदवार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी खासदारकीची निवडणूक लढवीत आहेत तर नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनलताई खतगावकर निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे यांना जन शक्तीचा प्रचंड पाठींबा मिळत आहे 

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी महाविकास आघाडी कडून नांदेड लोकसभा पोट निवडणुकीची निवडणूक लढवित असून त्याच काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून डॉ. मीनलताई खतगावकर हे नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवित असल्यामुळे विरोधकाला धसका बसत आहे 

नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवित असताना नामांकित पक्षाच्या उमेदवाराला मोठी कसोटी करावी लागते सदरची निवडणूक मोठी अटीतटीची होणार असल्यामुळे या मतदार संघाकडे व नांदेड लोकसभा पोट निवडणूकी कडे जिल्ह्याच नव्हे तर अख्या राज्यातल्या राजकीय नेते मंडळीचे लक्ष लागून आहे 

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण तर डॉ मीनलताई खतगावकर यांच्या पाठीशी प्रचंड जन शक्तीचा पाठींबा मिळत आहे 

Post a Comment

0 Comments