Header Ads Widget

डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक रिंगणात प्रचाराचा नारळ उद्या फुटणार विरोधकांना घाम ही फोडणार !!

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून तालुक्यातील बळेगाव येथील भूमिपुत्र डॉ मुकुंदराव नागोजीराव पाटील बेलकर यांनी या सदरच्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक रिंगणात विरोधकाचे दोन हात पाहण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात निवडणुकीचा रणसंग्राम खेळण्यासाठी सज्ज झाले असल्याचे सांगितले आहे 

नायगाव तालुक्यातील बळेगावचे भूमिपुत्र डॉ.मुकुंदराव नागोजीराव पाटील बेलकर यांनी सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा व सहकार्याची भावना डोळ्या समोर ठेवून गोरगरीब लोकांच्या लग्न कार्यामध्ये मोठ्या तळमळीने आपली सामाजिक बांधिलकी व आपुलकी जपत त्यांना मदत करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर हे करीत आहेत 

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक रिंगणात अपक्ष उमेदवारी म्हणून दाखल केल्याच्या नंतर बळेगावचे भूमिपुत्र डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर हे निवडणुकीच्या रिंगणात रंगसंग्राम खेळण्यासाठी सज्ज झाले आहे 

या सदरच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी खेळत असताना विरोधकांना घाम ही फोडणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसून येत आहे 

तालुक्यातील बळेगावचे भूमिपुत्र डॉ. मुकुंदराव नागोजीराव पाटील बेलकर हे दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडून नायगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत 

Post a Comment

0 Comments