Header Ads Widget

काँग्रेस पक्षाचे रुई बु नगरीचे माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांचे अपघातात निधन गावावर शोककळा !!


       
माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता व गावचे सुजळ नेतृत्व असलेले कै. भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांचे दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी अपघातात निधन झाल्यामुळे सुजळून नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्या असल्याने रुई बु नगरीसह परिसरात तालुक्यात शोककळा पसरली आहे 

तालुक्यातील बु.येथील रहिवासी असलेले काँग्रेस पक्षाचे तथा गावचे माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे गावच नेतृत्व हरपले असल्यामुळे त्यांना रुई बु नगरीच्या जड अंतःकरणाने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांच्या आज १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता अंत्यविधी त्यांच्यावर शेतात करण्यात येत आहे 

राजकीय वर्तुळात व गावात त्यांची राजकीय छाप असल्यामुळे अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक त्यांनी मोठ्या अटीतटीची लढविली असून ते आपल्या पार्टीत प्रमुख नेतृत्वाचा गावात बाणा ठेवून जनसामान्य माणसाच्या सुखा दुखात धावून जाणारे गावचे सुजळ नेतृत्व अख्या वी नगरीचा अखेरचा निरोप घेतला आहे 

रुई बु.येथील रहिवासी असलेले भुजंगराव पाटील शिंदे हे गावच्या राजकारणात म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकी मध्ये मोठी हिम्मत लावून निवडणुका लढवीत होते अशा ह्या नेतृत्वाचे अपघातात निधन झाले असल्यामुळे ईश्वर त्यांच्या परिपूर्ण आत्म्यास सुख शांती द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येत आहे 

माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी नातू सुना असा त्यांचा मोठा परिवार असून शिंदे परिवारावर दुःखात डोंगर कोसळला असल्यामुळे त्यांना दुखातून सावरण्यासाठी परमेश्वराने भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांच्या आत्म्यास शांती लाभावी हीच परमेश्वरा कडे प्रार्थना आहे




Post a Comment

0 Comments