Header Ads Widget

आता जनतेचा पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार आमदार बाबुराव कदम कोहळिकर श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांचा सत्कार मोठ्या थाटात संपन्न

     नागोराव शिंदे 
हिमायतनगर    हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मला भरघोष मतदान देऊन विजयी केले त्याबद्दल मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला व लाडक्या बहिणींच्या विश्वासाचे फलित म्हणजे  माझा विजय आहे हिमायतनगर शहरातील जनतेसाठी वाहून टाकतो व मी पाच वर्षात कधीच मतदाराच्या  विश्वासाला तडाजाऊ देणार नाही असे सांगत दिनांक २९नोव्हेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान  ट्रस्ट कमिटी कडून  हदगाव हिमायतनगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळिकर हे प्रथमच हिमायतनगर शहरात आल्या मुळे त्यांचा श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले की आता मी मतदार संघातील जनतेचा पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले...
यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी उपाध्यक्ष  महाविर श्रीश्रीमाळ आणि सर्व संचालक,ज्येष्ठ नागरिक,मतदार , कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments