महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी या राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण ? असा प्रश्न चर्चेला जात असून मुख्यमंत्री पदाचे दावेदार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असल्यामुळे राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी फडणवीस की शिंदे अशी ग्रामीण भागात चांगलीच चर्चा रंगत आहे
गेल्या दोन ते अडीच वर्षा पासून राज्यात राजकारणाचा खेळखंडोबा झाला असल्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन बरोबर इतर मालाना योग्य भाव मिळत नाही तरी अद्याप पीक विमा सुद्धा मिळाला नाही त्याच बरोबर शेतकऱ्याचे पंतप्रधान योजने बरोबर मुख्यमंत्री योजनेचे पैसे मिळत नाहीत केवायसीच्या नावाखाली सदरच्या सरकारने बंद केले आहे
"मग "तर राज्याचा मुख्यमंत्री कोण ? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे या राज्याचा भावी मुख्यमंत्री होणार या कडे जनतेचे लक्ष लागले असले तरी या राज्याचा मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस झाले तर शेतकऱ्याचे थोडे फारव का होईना प्रश्न मार्गी लागतील असे जनतेतून बोलल्या जात आहे
राज्यात होणारा राजकीय खेळखंडोबा तात्काळ बंद करून शेतकऱ्याच्या हितासाठी महायुतीने लवकर सरकार बनवून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवितले पाहिजे असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments