मांजरम नगरीचे जेष्ठ नागरिक तथा प्रगतशील शेतकरी स्वा.नागोराव बापूजी पाटील शिंदे यांचेदिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता वृध्दप काळाने निधन झाले ते मृत्यू समयी ७८ वर्षाचे होते
एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते अशा वेळी त्या व्यक्तीप्रती व त्याच्या कुटुंबियांप्रती संवेदना प्रकट करून आपण भावना व्यक्त करू शकतात म्हणून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
त्यांच्या पार्थिवावर दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता मांजरमच्या स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
“ मृत्यू हे अंतिम सत्य आहे.” हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या कुटुंबावर तो सर्वात मोठा आघात असतो. जेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमचे सोडून जाते तेव्हा त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीला मोठे दुःख होते
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तिन मुली जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे मांजरम नगरीचे युवा नेते मनोज पाटील शिंदे यांचे वडील होते
नांदेडचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजीराव पाटील शिंदे यांचे काका आहेत

0 Comments