Header Ads Widget

डॉ.माधवराव विभुते हे राजकीय क्षेत्रातील नवीन चेहरा असला तरी यांची ही उमदेवारीची चर्चा रंगू लागली !!

      माधव पवार 
राज्यात वंचित बहुजन आघाडीची राजकीय नेते मंडळींना धास्ती असल्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे चांगलेच वर्चस्व आहे 

वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी डॉ माधवराव विभूते यांना दिल्यामुळे त्यानी २८ ऑक्टोंबर रोजी आपली उमेदवारी दाखल केली आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी आरोग्य क्षेत्र सांभाळत राजकीय क्षेत्रामध्ये सदरच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेले डॉ माधवराव विभूते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवीत असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा होताना दिसत आहे 

नायगाव विधानसभा निवडणूका लागण्याच्या पूर्वीपासून डॉ माधवराव विभुते यांनी सदरचा मतदार संघ पिंजून काढला असून गावा गावात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली असल्याने डॉ माधवराव विभुते यांनी निवडणुकीच्या रिंगणात सक्रिय झाले आहेत 

Post a Comment

0 Comments