मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार नायगाव विधानसभा मतदारसंघाची अपक्ष उमेदवारी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करून अपक्ष उमेदवारी दाखल केली असल्याने "अबब " होटाळकर यांच्या शक्ती प्रदर्शनाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाच चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
अख्या जिल्ह्याचे राजकारण नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी कडे असल्यामुळे या नायगाव मतदार संघात अनेकांची उमेदवारी महत्त्वाची ठरत असली तरी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार भरण्यात आलेली मा. शिवराज पाटील होटाळकर यांची उमेदवारी लक्ष वेधी ठरली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवार आणि उमेदवारी दाखल केले आहेत सदरच्या निवडणुकीचा फड गाजविण्यासाठी व जिंकण्यासाठी आपापल्या पद्धतीने उमेदवार प्रयत्न करणार आहे
खरे तर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिनांक २८ऑक्टोंबर २०२४ रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आपली अपक्ष उमदेवारी दाखल केली आहे

0 Comments