महाराष्ट्र राज्याचे राजकारण एक प्रकारचे विचित्र असल्यामुळे व सध्याच्या परिस्थिती मध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे हळूहळू वाहवू लागल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघात ऐन वेळी फेरबदल होऊ शकतो ? असा अंदाज या मतदार संघातील जनतेने व्यक्त केला आहे
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत सध्या परिस्थितीत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षा कडून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनलताई खतगावकर यांचे नाव नायगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे
माजी खासदार यांच्या सुनबाई डॉ. मीनलताई खतगावकर हे लोकसभेवर तर जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांना नायगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर होऊ शकते असा अंदाज केला जात आहे
नायगाव मतदार संघात ऐन वेळी फेर बद्दल होऊ शकतो प्रा.रवींद्र पाटील चव्हाण हे विधानसभे साठी तर डॉ मीनलताई लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार असू शकतात ? असा जनतेनी अंदाज व्यक्त केला आहे

0 Comments