Header Ads Widget

सावधान : जिल्ह्यात गुटखा बंदी नंतर आता दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर पोलीस कारवाई होणार - आयपीएस अबिनाश कुमार !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर सिंगम आयपीएस अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात गुटखा बंदीची मोहीम हाती घेऊन प्रभावी पणे राबविली असल्यामुळे १०० टक्के सदरची मोहीम यशस्वी झाली असल्याचे ग्रामीण भागात स्पष्ट चित्र दिसून येत आहे जिल्ह्याचे सिंगम पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुटखा बंदी नंतर आता काही दिवसात दुसरी एक मोहीम प्रभावी चालविण्यासाठी हाती घेणार आहेत जिल्ह्यातील राज्य महामार्गावर ट्रॅव्हल्स असो ट्रक चालक असो जीप चालक असो अथवा मोटार सायकल स्वार असो यातील वाहन चालक दारूच्या नशेत वाहन चालवीत असतील तर त्यांची चौकशी करून पोलीस कारवाई करण्यात येणार आहे 

जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधिक्षक कुमार यांनी सांगितले असून सावधान वाहन चालकानो काही दिवसातच सदरची मोहिम हाती घेतली जाणार असून सदरचे अपघात टाळण्यासाठी अशा वाहन धारकाना चांगलाच आळा बसणार आहे आहे 

Post a Comment

0 Comments