Header Ads Widget

महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याने गोहत्या बंद होणार - सेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य.

नागोराव शिंदे 
देव कृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील भुमीपुजन सोहळ्यात बोलताना म्हणाले, आता आपल्या महाराष्ट्रात गोहत्या बंद होणार आणि जे जे लोकं असं बेकायदेशीर कृत्य करतील त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.१०६५ राज्यातील गोशाळाआंना लवकरच प्रती गोवंश प्रती दिवस ५० रूपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे गोशाळा लवकरच स्वयंपुर्ण होतील, दुसरी यानंतर गोशाळांच्या आर्थिक बळकटीसाठी गोमय मुल्य वर्धन योजना आणुन गोमय व गोमुत्राव्दारे गोशाळांना आर्थिक उत्पन्न मिळवुन दिले जाईल. गोसेवा आयोग किरण बिच्चेवार आणि त्यांच्या गोरक्षकांच्या कार्यात नेहमीच सहभागी होता आणि भविष्यात देखील राहील. किरण बिच्चेवार यांचा अत्याधुनिक शेड बघण्यासाठी मी पुन्हा येणार आहे असे मत व्यक्त केले.
आम्ही कोणी पत्यक्ष दिसलो नाही तरीही आम्ही किरण बिच्चेवार सोबतच आहोत- भाऊराव कुदळे, क्षेत्र गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद मुंबई क्षेत्र. अतिशय प्रतीकुल परीस्थितीचा सामना करत शेकडो केसेस करून कसायांना जेरीला आणणाऱ्या बिच्चेवार यांना प्रशासनाने त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या त्या अधिकाऱ्यांना संघटनेच्या ताकदीचा परीणाम भोगावा लागला. यांचे गोरक्षणाचे कार्य अतिशय पारदर्शकपणे ते सर्व शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करतात. परीणाम नांदेड जिल्ह्यात मागील १४ महीन्यात २२८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, एवढे गुन्हे महाराष्ट्रात ईतर कोणत्याही जिल्ह्यात नोंद झालेले नाहीत. कार्यकर्त्यांना सांभाळुन ठेवणे, त्यांच्या अडीअडचणीत मदत करणे हे किरण बिच्चेवार चे कौशल्य आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यावेळी उद्घाटक म्हणून मा श्री डॉ सुनीलजी सुर्यवंशी सदस्य गोसेवा आयोग, मा श्री अशोक जैन, अध्यक्ष प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य, मा श्री राजुभाई शहा, ट्रस्टी, वर्धमान संस्कार धाम मुंबई, मा श्री प्रतापरावजी देशमुख, माजी बांधकाम सभापती जि.प. नांदेड,
मा श्री अनिरुद्धजी केंद्रे, विशेष संपर्क प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत, मा श्री महाविरसेठ श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष, श्री परमेश्वर मंदीर ट्रस्ट वाढोणा,
मा श्री शामजी रायेवार, धर्मप्रसार सह प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत,
मा श्री रामचंद्र पाटील, श्री सुभाषराव बलपेलवाड, श्री आशीष सकवान आणि ईतर 
आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळुन नांदेड जिल्ह्यात गोहत्येविरूध्द एक अभियान सुरू केले होते. निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या परीश्रमाने एकट्या नांदेड जिल्ह्यात ऐतिहासिक गोरक्षणाचे कार्य झालेले आपल्याला दिसत आहे. याचे सर्व श्रेय विश्व हिंदु परिषदेला जाते, विपरीत परिस्थितीत संघटना आमच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहते म्हणुन आम्ही यशश्वीपणे कसायांना तोंड देऊ शकत आहोत. हे जोखीमीचे काम करत असताना कळत नकळत ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार किरण बिच्चेवार संचालक यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments