Header Ads Widget

नांदेड लोकसभा पोट निवडणुकीची उमदेवारी तुफानी शक्ती प्रदर्शन करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी केली दाखल !!

       माधव पवार 
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मोहन अण्णा हंबर्डे नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार शेठ यांचा नाम निर्देशन अर्ज भरण्यासाठी भव्य अशा महा रॅलीचे आयोजन  करण्यात आले आहे 

नांदेड शहरामध्ये करण्यात आले. या भव्य रॅलीमध्ये काँग्रेस,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार साहेब गट) महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष पदाधिकारी मतदार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

या भव्य रॅलीचे महासभेत रूपांतर झाले या सभेला मा.अमित भैया देशमुख यांनी संबोधित केले यावेळी प्राचरसभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माधवराव पाटील किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर 

आ.मोहनराव हंबर्डे, अब्दुल सत्तार, सौ.मीनल खतगावकर, तिरुपती कोंडेकर, निवृत्ती कांबळे, भगवानराव आलेगावकर,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, ईश्वरराव भोसीकर , दत्ता कोकाटे,धोंडू पाटील, प्रकाश मारावार,सुरेंद्र घोडजकर, राजेश पावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेड लोकसभा पोट निवडणुकीची उमदेवारी तुफानी शक्ती प्रदर्शन करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी दाखल केले आहे 

Post a Comment

0 Comments